भिवंडीत घरफोडी, ५ लाख, ८० हजारांचा ऐवज चोरीला; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

भिवंडीत घरफोडी, ५ लाख, ८० हजारांचा ऐवज चोरीला; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

भिवंडी – येथील अंजुरफाट्याजवळ झालेल्या घरफोडीत वेअरहाऊसमधून झिंक इंगोट मेटल ऐवज चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष लच्ची रेड्डी (रा. अंजुर फाटा, भिवंडी) यांनी घरफोडी झाल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली आहे. २२ जून, २०२४ च्या सुमारास भिवंडी, ओवळी येथील चोरट्याने कंपनीच्या वेअरहाऊसचे लोखंडी शटर उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून आतमध्ये ठेवलेले झिंक इंगोट मेटल ०२ बंडल चोरून नेले.एकूण ५,७९,३००/- रुपये किंमतीचे ऐवज घरफोडी करून चोरट्याने लंपास केले. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजि. नं. | १२८४/२०२४ भा. द. वि. कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon