रबाळे परिसरात जुगारांचे अड्डे; जुगार माफियांना पोलीसांकडून संरक्षण ? आयुक्तांकडून कारवाईची अपेक्षा
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई – नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी परिसरात घोडी व काठी नावाचा खेळला जाणारा मोठा जुगार सध्या तेजीत सुरु आहे. हा जुगार सर्वसामान्य माणसांचा नसून नामचीन माफिया व व्यापाऱ्यांचा हा जुगार नवीमुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सुरु आहे. सदर खेळ हा कमीत कमी पाच लाखापासून सुरू होत असून पुढे दोन ते तीन करोड पर्यंत या खेळात उलाढाल होत असते. हा बेकायदेशीर जुगार मशा नावाचा इसम (चेंबूर) व त्याचा साथीदार माऊली मौर्या (वापी) हे जुगार माफिया चालवत असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली आहे. हा जुगार खेळण्यासाठी भारताच्या अनेक राज्यातून मुख्यतः गुन्हेगार किंवा माफिया तसेच मोठमोठे व्यापारी रबाळे एमआयडीसी मध्ये येत असतात. पोलीस प्रशासनाला या बाबतची माहिती असुनही सदर जुगार बंदी बाबत पोलीस उदासीन असुन त्यांना पोलीस प्रशासनाचेच अभय असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
सदर जुगार चालवणारे मशा रा. चेंबूर माऊली व गौर्या रा. वापी हे तिघेही मॅचचे सट्टेबाजार चालवणारे आहेत. आमच्यावर वर्षांचा आशीर्वाद असल्याने आम्ही बिंदास जुगार चालवतोय कोणाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही अशी दरपोक्ती ते करीत असल्याचे दिसून येत आहे. आता या जुगार माफियांना कोणाचा हात आहे, कोणाच्या सांगण्यावरून पोलीस यांच्या बेकायदेशीर धंद्याला अभय देत आहेत? याची चौकशी होणे गरजेचे आहे. अशा बेकायदेशीर धंद्यामुळे बाहेरून येणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जुगार माफियांमार्फत चालवले जाणारे बेकायदेशीर जुगार अड्डे तातडीने बंद करावेत अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.