रत्नागिरीत घरफोडी करत ५० हजारांचा ऐवज लंपास, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
रत्नागिरी – शहरात घरफोडी व चोऱ्या होण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. अशीच एक घरफोडी ची घटना नुकतीच घडली. रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी – गुरववाडी येथील बंद घर फोडून अज्ञाताने रोख रक्कम चादींच्या वस्तू असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज लांबवला .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार ८ जून रोजी सायंकाळी ६.३० ते रविवार ९ जून रोजी सकाळी ७.३० वाजता या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार , त्यांचे काका वामन सुतार काही कामानिमित्त कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा उठवत अज्ञाताने त्यांच्या घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप कोणत्यातरी हत्याराने कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर घराच्या शयनगृहातील लोखंडी आणि लाकडी कपाटाचे लॉकर उघडून रोख ४४ हजार ४०० रुपये आणि १ हजार ५०० रुपयांचा चांदीच्या दोन छोट्या समया असा एकूण ४९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. या प्रकरणी अज्ञाताविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम ४५४,४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .