महिला कंडक्टरच्या कानशिलात लगविणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा

Spread the love

महिला कंडक्टरच्या कानशिलात लगविणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

जळगाव – तालुक्यातील कंडारी येथे बसला थांबा नसून तेथे बस थांबणार नाही. त्यामुळे नेरी गावापर्यंत तिकीट काढावे लागेल, असे सांगितल्याच्या कारणावरून बसमधील महिला वाहकाशी (कंडक्टर) वाद घालत प्रवासी तरुणाने त्यांच्या कानशिलात लगावली. हा धक्कादायक प्रकार इच्छादेवी चौकात शुक्रवार, ३ मे रोजी घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण कमलसिंग परदेशी (२०, रा. कंडारी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते जामनेर या बसमध्ये करण परदेशी हा तरुण जळगाव बसस्थानकातून बसमध्ये बसला. बस इच्छादेवी चौकातून जात असताना महिला वाहक (कंडक्टर) यांनी कंडारी गावाला थांबा नसल्याचे करणला सांगितले. त्यामुळे नेरीपर्यंतचे तिकीट काढावे लागेल. त्यावरून वाद होऊन तरुणाने वाहकाच्या कानशिलात चापटा मारुन शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी महिला वाहकाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून करण परदेशी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon