मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर बर्निंग बसचा थरार! भीषण आगीत बस जळून खाक

Spread the love

मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर बर्निंग बसचा थरार! भीषण आगीत बस जळून खाक

पोलीस महानगर नेटवर्क

खोपोली – लग्नाचे वऱ्हाड मुंबईहून सोलापूरला जात असताना बसला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग लागली. आज मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बस अक्षरक्ष: जळून खाक झाली. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४२ जणांचे प्राण वाचले.

याबाबत अधिक माहिती अशी की, ही बस मुंबईहून सोलापूरकडे वऱ्हाड घेऊन निघाली होती. रात्री दोनच्या सुमारास ही बस मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खोपोलीजवळ आली असताना या बसला आग लागली. आग भडकल्याचे दिसताच प्रवाशांनी प्राण वाचवण्यासाठी आरडाओरडा करत मदतीसाठी याचना सुरू केली. दरम्यान, महामार्ग पोलीस, अग्निशमन दल, डेल्टा फोर्स आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असणाऱ्या संस्था यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले. समोर आलेल्या आकडेवारीनुसार या बसमधून ४२ प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे बसला आग लागल्यानंतर तातडीने मदत पोहोचली नसती तर या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असती. दरम्यान, समोर येत असलेल्या प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon