स्वताच्या घरातच सुरू केला वेश्या व्यवसाय, पोलिसांची धाड; परदेशी तरुणीची सुटका
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी – पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात वेश्या व्यवसायाला पेव फुटले आहे. कधी मसाज पार्लर च्या नावाखाली तर कधी स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला जातो. अशीच एक घटना पिंपरी परिसरात घडली आहे. स्वतच्या आर्थिक फायद्यासाठी परदेशी महिलेकडून वैश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या व्यक्तीच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी परदेशी तरुणीची सुटका केली असून निखिल मोरे नावाच्या २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आलीय. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. पोलिसांनी युगांडा देशातील तरुणीची वेश्या व्यवसायातून सुटका केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवरामनगर परिसरातील कोहीनुर प्लाझा मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीची पोलिसांनी खात्री करून सदर ठिकाणी छापा टाकला असता युगांडा येथील तरुणी वेश्याव्यवसाय करताना दिसून आली. आरोपीने पैशाचे आमिष दाखवून या तरुणीला आणले होते. त्यानंतर या तरुणीला जास्त पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून आरोपी या ठिकाणी वेश्याव्यवसाय करून घेत होता. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे
तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण व पोलीस पथकाने केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे करीत आहेत.