अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक
११ लाख ७२ हजारांचे अंमली पदार्थ केले हस्तगत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आरोपीला वागळे इस्टेट, गुन्हे शाखा घटक – ५ , शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून ११ लाख ७२ हजारांचे ३८० रुपयांचे कोकेन हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे पोलीस हवालदार रावते व त्यांच्या पथकाने मॉडेला नाका, मेट्रो ब्रिज पिलरजवळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम येथे सापळा रचून आरोपी मनजीत सीताराम साँ, वय-३६ वर्ष , रा. शास्त्रीनगर, विलेपार्ले पूर्व, मुंबई याची रिक्षा ताब्यात घेऊन त्या रिक्षाची झडती घेतली असता त्यामध्ये कोकेन हा अंमली पदार्थ , एक विवो व एक आयटेल कंपनीचा मोबाईल फोन , रोख रक्कम असा एकूण ११,७२,३८०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल बेकायदेशीररीत्या विक्रीकरिता बाळगून असताना आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
सदर प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा रजि. नं. || ५०५/२०२४ एन.डी.पी.एस कायदा १९८५ चे कलम ८ (क), २१ (ब) प्रमाबे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे हे करीत आहेत