पिंपरी चिंचवड परिसरात शेअर्स खरेदीच्या बहाण्याने ३५ लाखांची फसवणूक

Spread the love

पिंपरी चिंचवड परिसरात शेअर्स खरेदीच्या बहाण्याने ३५ लाखांची फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क

निगडी – माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वत्र नागरिकांना ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार सर्रासपणे होत आहे. असाच एक प्रकार घडला आहे. शेअर्स खरेदीचा बहाणा करत एका ४९ वर्षीय इसमाची तब्बल ३५लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य तुकाराम रानभरे, वय ४९ रा. निगडी प्राधिकरण यांना एका व्हॉटसग्रुपवर सामावून  घेऊन तिथे त्यांना शेअर्स खरेदी बद्द्ल सांगितले गेले असता ग्रुप एडमिन ने फिर्यादी यांना पी.टी. एप्लिकेशन मध्ये जाऊन शेअर्स विकून पैसे काढून घेण्यास सांगितले. फिर्यादी यांनी ते पैसे काढले मात्र त्यांच्या खात्यात ती रक्कम जमा झाली नाही. फिर्यादी यांनी ग्रुप एडमीनला फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणात फिर्यादी यांनी ३५ लाख ४० हजार ३१० रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. ती रक्कम परत न देता फिर्यादीची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी फिर्यादी यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आदित्य पाटील, मनोज कुमार व इतर दोन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon