जळगावमध्ये बंदुकीचा धाक दाखवून तरुणाला १२ लाखांना लुटले; जामनेर रोडवरील घटना

Spread the love

जळगावमध्ये बंदुकीचा धाक दाखवून तरुणाला १२ लाखांना लुटले; जामनेर रोडवरील घटना

जळगाव – जळगाव जिल्ह्यात लूटमार,घरफोडी या सारखी गुन्हेगारी काही थांबताना दिसत नाही. यात जबरी चोरीच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच आता बॅगेत पैसे घेऊन जाणाऱ्या तरुणाला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तरुणाला बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील १२ लाखाची रक्कम घेऊन फरार झाले. ही धक्कादायक घटना जामनेर रोडवरील महादेव माळ फाट्याजवळ घडली.

नशिराबाद येथून दुचाकीवर एक तरुण बॅग घेऊन जामनेरच्या दिशेने जात असताना तरुणाजवळ असलेल्या बॅगमध्ये रोकड असल्याची पाळत ठेवून तीन जण दुचाकीवर त्याचा पाठलाग करीत होते. जामनेरकडे जाणाऱ्या महादेव माळ फाट्याजवळ रस्त्यावर दुचाकी आडवी लावून तिघांनी गावठी पिस्तूल तरुणाच्या डोक्याला लावून त्याच्याकडून पैशाची बॅग हिसकावली व तेथून दुचाकीवरून पसार झाले. बॅगमध्ये १२ लाखांची रोकड असल्याची तरुणाने माहिती दिली.

ही घटना भुसावळ तालुका पोलिस ठाणे हद्दीत घडली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. या घटनेचा वरिष्ठ अधिकारी व पोलिस उपअधीक्षक कसून तपास करीत आहेत. अद्यापपर्यंत घटनेसंदर्भात कुठलीही सविस्तर माहिती न मिळाल्याचे पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी सांगितले.सदर घटनेबाबत तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon