डोंबिवलीत चोरट्याचा सुळसुळाट; बंद घरातून लाखोंचे दागिने केले लंपास
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – डोंबिवली परिसरात सध्या चोरट्याचा सुळसुळाट सुरू आहे.सुट्टीचे दिवस असल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर गावा कडे जाताना दिसतात. याचा फायदा घेत चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. डोंबिवली मध्ये घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दि.२ एप्रिल, २०२४ ते दि.३ एप्रिल, २०२४ दरम्यान सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने जवळपास दीड लाख रुपयाहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे.
फिर्यादी सजंय सखाराम धनावडे, (५१ वर्ष,) रा.डोंबिवली पश्चिम यांचे राहते घराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडुन त्यावाटे आत प्रवेश करून घरातील एकुण १ लाख ८८ हजार ५०० रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने घरफोडी चोरी करून नेले आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द विष्णूनगर पोलीस ठाण्यातगुन्हा रजि.नं. | ३७७/२०२४ भा.द.वि.कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे हे करीत आहे.