लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर एपीएमसी पोलिस ठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपेरेशन सुरू

Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर एपीएमसी पोलिस ठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपेरेशन सुरू

तब्बल ११ लाखांच्या अमली पदार्थांसह एक पिस्तूल हस्तगत,अनेकांवर गुन्हा दखल, एक आरोपी गजाआड

योगेश पांडे / वार्ताहर 

नवी मुंबई – एपीएमसी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत तब्बल ११ लाखांच्या अमली पदार्थांसह एक पिस्तूल हस्तगत केले आहे. पाेलिसांच्या अचानक झालेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांची पळता भुई थाेडी झाली. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईसाठी कंबर कसली आहे. नवी मुंबई पोलिसांनी विविध पोलिस ठाणे अंतर्गत कॉम्बिग ऑपेरेशन राबविण्यास प्रारंभ केला आहे. त्यानुसार परिमंडळाचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्यातर्फे एपीएमसी पोलिस ठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपेरेशन राबविण्यात आले. यासाठी पोलिस मुख्यालया मार्फत अतिरिक्त पोलिसांची कुमक देखील पुरविण्यात आली आहे.

एपीएमसी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत तब्बल ११ लाखांच्या अमली पदार्थासह एक पिस्तूल हस्तगत केले. तुर्भे गाव, एपीएमसी, कोपरी परिसरात गुन्हेगारांचे अड्डे, अमली पदार्थ विक्रेते यांच्या ठिकाणांवर धाडी टाकत संशयित व्यक्तींची, वाहनांची देखील झाडाझडती घेण्यात आली. एकता नगर झोपडपट्टी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ४४ हजार रुपये किमतीचे एमडी अमली पदार्थ मिळून आले. याप्रकरणी रुना शेख, धनलक्ष्मी स्वामी, रेखा शेख आणि रुबिना शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रीन पार्क झोपडपट्टी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ५५ हजार रुपये किमतीचे एमडी अमली पदार्थ मिळून आले. याप्रकरणी अकबर शेख, जुगल शेख, दिलीप राठोड, रशिदा शेख आणि तस्लिमा खातून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच तुर्भे रेल्वे स्थानक परिसरातुन पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकावर कारवाई करण्यात आली असून हबीब शेख असे आरोपीचे नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon