निवडणूक आयोगाची घाटकोपरमध्ये मोठी कारवाई, ७२ लाखांची रोकड जप्त

Spread the love

निवडणूक आयोगाची घाटकोपरमध्ये मोठी कारवाई, ७२ लाखांची रोकड जप्त

दोन्ही आरोपींपैकी एक सीए, तर दुसरा इनकम टॅक्स प्रॅक्टिसनर

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – दोन दिवसांपूर्वी राज्यात निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर राज्यात वेगाने राजकीय घडामोडी होत आहेत. याच पार्श्वभूमीवर घाटकोपरच्या पंतनगरमध्ये निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने ७० लाखांची रोकड जप्त केली आहे. निवडणूकीचे बिगुल वाजत नाही तोच घाटकोपरच्या पंतनगरमध्ये ७० लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांची कसुन चौकशी करण्यात येत आहे. इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने ही कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने घाटकोपरमध्ये मोठी कारवाई केली आहे.

इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने गाडीतून ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपये जप्त केले आहेत. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोघांपैकी एक व्यक्ती सीए आहे, तर दुसरा व्यक्ती इनकम टॅक्स प्रॅक्टिसनर असल्याचं समोर आलं आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम एका विकासकाकडून पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

या प्रकरणी पंतनगर पोलीस आणि इलेक्शन सेलचा स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉड अधिक तपास करत आहेत. १६ मार्च रोजी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. ही रक्कम निवडणूकीच्या कामासाठी वापरणयात येणार होती, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon