नाशिकमध्ये २० लाखांचा गांजा जात ; गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – दिवसेंदिवस नाशिक व पुणे परिसरात गांजाची तस्करी वाढत चालली आहे. अशीच एक घटना नाशिकमधील मखमलाबाद शिवारात घडली. होंडाई कंपनीची असेंट कारमध्ये २० लाख ३७ हजाराचा गांजा नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने जप्त केला. मखमलाबादमध्ये विनायक रो-बंगलो नावाचे रो हाउसेस समोरील रस्त्यावर, मानकर मळा येथे ज्ञानेश्वर बाळु शेलार, वय ३२ वर्षे, हल्ली रा. जयशंकर रो हाऊस नं. ०८, श्रीकृष्ण मंदीराजवळ, मानकर मळा, मखमलाबाद, नाशिक, मुळ रा. घर नं. १९३, वावरे लेन, शिवाजी रोड, शालीमार, भद्रकाली, नाशिक, निलेश अशोक बोरसे, वय २७ वर्षे, रा. रो हाऊस नं. १ बी १, मातोश्री निवास, पुष्कर व्हॅली अपार्टमेंट, औदुंबरनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले असून दोघांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस (गुन्हे) आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे व सहायक पोलीस आयुक्त भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सहायक पोलीस निरीक्षक तोडकर, पोलीस उपनिरीक्षक लाड, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, पोलीस हवालदार: संजय ताजणे, देवकिसन गायकर, किशोर रोकडे, गणेश भामरे, डंबाळे, पोलीस नाईक: भूषण सोनवणे, दिघे, चकोर, पोलीस अंमलदार: वडजे, येवले, सानप, नांद्रे, बागडे, निकम, फुलपगारे, राऊत यांनी केली.