इंदापूर गोळीबाराची पुनरावृत्ती, ‘हॉटेल मराठा’च्या मालकावर गोळीबाराचा थरार

Spread the love

इंदापूर गोळीबाराची पुनरावृत्ती, ‘हॉटेल मराठा’च्या मालकावर गोळीबाराचा थरार

पोलीस महानगर नेटवर्क

चाकण,पुणे – इंदापूर येथे हॉटेलमध्ये बसलेल्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. इंदापूरातील ही घटना ताजी असतानाच आज चाकणमध्ये याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे. ‘हॉटेल मराठा’च्या मालकावर दोघांनी गोळीबार केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. खुनातील आरोपींना मदत केल्याच्या कारणावरून चार जणांच्या टोळक्याने (दि.१८ ) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सराईत गुन्हेगारावर बेधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

राहुल पवार (रा. महाळुंगे ता. खेड), अजय गायकवाड (रा. म्हाळुंगे ता. खेड) व इतर दोन अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल करुन अजय गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यापूर्वी आरोपी राहुल पवार याचा लहान भाऊ रितेश पवार याचा खून झाला होता. खुनातील आरोपींना सोप्या शिंदे ह्याने मदत केल्याची माहिती आरोपींना मिळाली. याच रागातून आरोपी सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मराठा हॉटेलमध्ये आले. त्यांनी खुनातील आरोपींना मदत व सहकार्य केल्याच्या रागातून सोप्या शिंदे याच्यावर दोन गोळ्या झाडल्या.

या घटनेत फिर्यादी सोप्या शिंदे याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अजय गायकवाड याला ताब्यात घेतले. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon