एन्काऊंटर स्पेशालिस्ट व माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा

Spread the love

एन्काऊंटर स्पेशालिस्ट व माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस अधिकारी आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २००६ च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने मंगळवारी निर्णय दिला आहे.

२००६ मध्ये झालेल्या लखन भैय्या एन्काउंटरची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ती चकमक बनावट असल्याचं एसआयटी चौकशीत उघड झालं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसातील १३ अधिकारी आणि पोलिसांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्मांचाही समावेश होता. त्यानंतर २००८ मध्ये त्यांना निलंबितही करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर सुनावणी पार पडली आणि अखेर आज न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जन्मठेप सुनावली आहे.

कोण आहेत प्रदीप शर्मा?

प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत एक अधिकारी होते. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या नावावर १०० हून अधिक चकमकींचा विक्रम आहे. ते १९८३ मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले आणि २०१९ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. प्रदीप शर्मा यांनी २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. यानंतर, २५ फेब्रुवारी २०२१ रोजी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या घरातील अँटिलिया बाहेर स्फोटक पदार्थ सापडल्याच्या प्रकरणामुळे ते चर्चेत आले. याप्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला अटक करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon