जादा परताव्याचे आमिष दाखवून कल्याणमधील महिलेची लाखोंची ऑनलाईन फसवणूक ; पोलिसांत गुन्हा दाखल

Spread the love

जादा परताव्याचे आमिष दाखवून कल्याणमधील महिलेची लाखोंची ऑनलाईन फसवणूक ; पोलिसांत गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – राज्यात शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांनी जनजागृती करून देखील नागरिक खोट्या आमिषाला बळी पडून आपले आर्थिक नुकसान करून घेतात. ठिकठिकाणी जादा रक्कम मिळेल याचं आमिष दाखवून लुबाडणूक केली जात आहे. अशीच एक घटना कल्याणमधील रामबाग परिसरात घडली आहे. रामबाग मध्ये राहणाऱ्या एका महिलेला व्हाट्सअप मेसेज करून शेअर मार्केट क्लास जॉईन करण्यास सांगून ‘स्माईल’ हे अँप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना सदर अँपद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल. अधिक नफ्याच्या आमिषाला बळी पडून तब्बल ९ लाख २० हजार रुपये रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

रामबाग,कल्याण पश्चिम परिसरात राहणाऱ्या (४८) या महिलेला अनोळखी मोबाईलधारक महिला व पुरुष यांनी दि.१५ फेब्रुवारी,२०२४ ते २०, फेब्रुवारी,३०२४ दरम्यान व्हाट्सअप मेसेज करून शेअरमार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास भरघोस नफा मिळण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी महिलेने आरोपीना एकूण ९,२०,०००/- रु. रक्कम ऑनलाईन पद्धतीने दिले व फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. सदर प्रकाराबाबत फिर्यादी महिला यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईलधारक आरोपींविरुद्ध गुन्हा रजि. नं. || २६३ /२०२४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम, ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस निरीक्षक नाईक हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon