हिंजवडी पोलिसांचा हुक्का पार्लर वर छापा
पुणे – भुगाव रोड, बावधन येथे एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. हॉटेलचा मालक आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवस्थापक प्रवीण अमृतलाल गौतम (वय १९, रा. भूगाव, ता. मुळशी), मालक समीर श्रीधर शेट्टी (वय ४१, रा. वारजे, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याप्रकरणी पोलीस अंमलदार रवी पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील हॉटेल रुड लाऊंज येथे हॉटेल चालकाने हुक्का पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पिण्याचे फ्लेवर तसेच इतर साहित्य उपलब्ध करून देऊन त्याचे हुक्का पार्लर शर्ती पेक्षा जास्त वेळ सुरू ठेवले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच हॉटेल ३० एप्रिल २०२१ पर्यंत सील करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड सहाय्यक निरीक्षक सागर काटे उपनिरीक्षक रवींद्र मुदळ, पोलीस कर्मचारी योगेश शिंदे, संतोष शिंदे, सचिन सानप, हिंजवडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आतिष साखरे, लक्ष्मण ढवळे, गणेश मांजरे, संतोष तुपे यांच्या पथकाने ही कारवाई केली.