कल्याण रेल्वे स्थानकात स्फोट घडवून आणण्याचं कारस्थान उधळल; बेवारस बॅगेत सापडली स्फोटके

कल्याण रेल्वे स्थानकात स्फोट घडवून आणण्याचं कारस्थान उधळल; बेवारस बॅगेत सापडली स्फोटके

प्रकाश संकपाळ

कल्याण – कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम फलाट क्रमांक १ च्या बाजूला दोन बॉक्समध्ये स्फोटके आढळून आल्याने खळबळ उडाली.रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत कल्याण रेल्वे स्टेशनच्या जवळ एका बेवारस बॅगेमध्ये डीटोनेटर (स्फोटके) मिळून आल्याने सर्वत्र घबराट पसरली होती. बुधवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेने स्टेशन परिसराला पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला.कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर १च्या बाहेरील बाजूस एक बेवारस बॅग सापडल्याने सदर बॅगेची डॉग युनिट बीडीडीएस कडून तपासणी करण्यात आली असता त्या बेवारस बॅगमध्ये अंदाजे ५४ डीटोनेटर (स्फोटके) असल्याचे निदर्शनास आले.

कल्याण परिमंडळ – ३ चे पोलीस उपायुक्त डॉ.सचिन गुंजाळ व रेल्वे पोलीस उपायुक्त घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कल्याण लोहमार्ग पोलीस व बॉम्बशोधक पथक डॉग्स स्कॉट सह स्टेशनवर दाखल झाले.दोन संशयित बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत.सीसीटीव्ही च्या आधारे सदर बॉक्स कुणी ठेवले व का ठेवले याचा तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon