येरवडा कारागृहात कैद्यांकडून तुरुंग अधिकाऱ्याला बेदम मारहाण; पुण्यातील खळबळजनक घटना
पुणे – येरवडा कारागृहात पोलीसच असुरक्षित असल्याची घटना उघडकीस आली आहे. कारागृहात असलेल्या आंदळकर टोळीने कारागृह अधीक्षकार हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले, यामुळे येरवडा कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या कारागृहातील कारागृह अधीक्षकाला आंदेकर टोळीच्या सदस्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये कारागृह अधिकारी शेरखान पठाण हे जखमी झाले आहेत. येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी दहा ते बारा कैद्यांमध्ये आणि शेरखान पठाण यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. त्यावेळी एकमेकांना शिवीगाळ करण्यात आलेली होती. त्यावरून ही धुसफूस सुरू होती. गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पठाण यांच्यावर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने हल्ला केला. त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेची कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे अधीक्षक ढमाळ यांनी सांगितले.
अधिकाऱ्याच्या डोळ्याखाली जखम, हात फ्रॅक्चर
मारहाण करणारे आरोपी हे पुण्यातील कुख्यात टोळी असलेले आंदेकर टोळीतील आहेत. विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे अशी आरोपींची नावं आहे. दोघेही मागील काही वर्षांपासून अनेक गुन्ह्यांमुळे शिक्षा भोसत आहेत. या दोघांनी इतर १० कैद्यांना सोबत घेतलं आणि थेट पठाण यांना मारहाण करायला सुरुवात केली. हे पाहताच कारागृहातील बाकी अधिकारी जमा झाले. या मारहाणीत पठाण यांच्याउजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली आहे. तसेच उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे.