ठाण्यात मामाकडून १ कोटी रुपयांची खंडणी उकळताना भाच्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
प्रकाश संकपाळ
ठाणे – मामाकडून १ कोटी रुपयांची खंडणी घेणाऱ्या भाच्याला खंडणी विफोडही पथकाने अटक केली आहे.मंगेश थोरात असे अटक करण्यात आलेल्या भाच्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मंगेशची मामी जयश्री तुपे हिने मंगेशला व्यवसाय करण्यासाठी ६१ लाख रुपये हातउसने दिले होते तसेच तिने पुनीत कुमार या व्यक्तीकडे व्यवसायासाठी १ कोटी २५ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.त्यासंदर्भात दोघांमध्ये करारनामा देखील झालेला होता, परंतु पुनीत कुमार हा जयश्री तुपे यांना पैसे परत देत नव्हता,म्हणून त्यांनी सदरचे पैसे काढून देण्यासाठी मंगेशला सदरचा करारनामा देऊन काही रक्कम दिली होती, परंतु मंगेशने दिलेल्या करारनामाचा फायदा घेऊन आपला मामा सुभाष तुपे व मामी जयश्री तुपे यांना अँटी करप्शन ब्युरो मध्ये तक्रार
करेन तसेच बदनामी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.हातउसने दिलेले पैसे परत मागू नये म्हणून १ कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याची तक्रार मामा सुभाष तुपे यांनी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे केली होती.त्या अनुषंगाने पोलिसांनी खारघर टोलनाका, नवी मुंबई येथे सापळा रचून मंगेशला १ कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना ताब्यात घेऊन नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
सदरची कामगिरी ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण,अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील,सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-२,(गुन्हे शाखा),राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे खंडणी विरोधी पथकाचे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे,पोलीस निरीक्षक वनिता पाटीक,सपोनि भूषण कापडणीस,सुनील तारमाळे व त्यांच्या पथकाने केली