भिवंडीत वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकाणाऱ्या आरोपीला केले जेरबंद ; पडघा पोलिसांची कारवाई

Spread the love

भिवंडीत वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकाणाऱ्या आरोपीला केले जेरबंद ; पडघा पोलिसांची कारवाई

प्रकाश संकपाळ

भिवंडी – पडघा येथील ब्राह्मण आळी परिसरात राहणाऱ्या आशा सुरेश चवरे (६१) या घरी बसलेल्या असताना अज्ञात आरोपीने फिर्यादी यांना पिण्यासाठी पाणी मागितले व किती वाजले असे विचारून फिर्यादी ह्या वेळ बघण्यासाठी त्यांच्या घरातील भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे मान फिरवून पहात असताना आरोपीने फिर्यादी यांच्या गळ्यातील ९ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.फौ/विष्णू किल्लेदार, पो.ना. हरिश्चंद्र झांजे, पो.ना.बाळा जाधव, पो.कॉ. योगेश वाघेरे हे तात्काळ घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही कॅमेरा व गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून आरोपीचा शोध घेतला असता तो भादाणे गावचे जंगलामध्ये असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचून आरोपीस अत्यंत शिताफीने पकडण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव डॅनी उर्फ अनिल शंकर सावंत. वय(२८) असून तो

मु.रा.भादाणे,पोस्ट – पडघा, ता.भिवंडी, जि. ठाणे येथे राहत होता. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा रजि. क्र. व कलम

८०/२०२४ भा.दं.वि.सं कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर आरोपीकडून ३२०० -रुपये किंमतीची ९ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली आहे. सदर आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याच्यावर पडघा पो.ठाणे गुन्हा रजि नं. १२३/२०२२ भा.दं.वि.सं. कलम ४५४,३७९ तसेच गुन्हा रजि. नं.३४२/२०२३ भा.दं.वि.सं.कलम ३९२ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.फौ विष्णू किल्लेदार, पो.ना हरिश्चंद्र झांजे, पो.ना बाळा जाधव,पो.कॉ नरेश निमसे, पो.कॉ योगेश वाघेरे,पो.कॉ जितू पानसरे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon