पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील रिकाम्या डब्याला लागली आग, आगीत डबा जळून खाक
पुणे – पुणे रेल्वे स्टेशनवरील यार्डात उभ्या असलेल्या तीन डब्यांपैकी मधल्या डब्याला मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत रेल्वे डबा पूर्णपणे जळून खाक झाला.
पुणे रेल्वे स्थानकात क्वीन्स गार्डनच्या शेजारी यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या स्लिपर कोचच्या डब्ब्याला मध्यरात्री भीषण आग लागली. ही आग ऐवढी भीषण होती की, आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात हवेत होते. या घटनेमुळे रेल्वे प्रशासानाची तारांबळ उडाली. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी रवाना झाले. त्यांना बऱ्याच दिवसंपासून स्थानकात उभ्या असलेल्या रेल्वेच्या एका डब्ब्याला मोठी आग लागल्याचे निदर्शनास आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्यास सुरुवात केली. सुमारे तासाभरा नंतर ही आग विझवण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांन यश आले. या घटनेत सुदैवाने जीवित हानी अथवा जखमी झाले नाही.