कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या बॅगा चोरणारा आरोपी गजाआड ; रेल्वे पोलिसांची कारवाई

Spread the love

कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या बॅगा चोरणारा आरोपी गजाआड ; रेल्वे पोलिसांची कारवाई

प्रकाश संकपाळ

कल्याण – मध्य रेल्वेवरील जंक्शन म्हणून ओळखले जाणारे व दररोज लाखो प्रवासी कल्याण रेल्वे स्थानकातून ये -जा करत असतात, मात्र या रेल्वे स्थानकावर बॅगा, पर्स, पाकीट चोरी करणारे भामटे नेहमीच संधीचा फायदा घेत असतात. गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि लूटच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः रेल्वे परिसरात गुन्हेगारी वाढल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. चोरी आणि चैन स्नेचिंगच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या डझनभर चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्यानंतर ही चोऱ्यांच सत्र सुरूच आहेत. अशीच एक घटना कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात घडली. एक प्रवासी तिकीट खिडकीवर तिकिटासाठी उभा असताना त्याची बॅग चोराने लंपास केली, त्यामध्ये त्याचे ५ हजार रुपये असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. फिर्यादी मोहन दिलीप सिंग याने त्याची बॅग चोरी झाल्याची तक्रार रेल्वे पोलीस ठाण्यात दिली असता गुन्हे प्रकटीकरणं शाखेच्या अधिकारयांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबींच्या आधारावर गुन्हेगारापर्यंत पोहचून त्याला जेरबंद केले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद फिरोज मन्सूरी (२५) असून त्याचा भाऊ मोहम्मद नसरुल मोह. मौजे मन्सूरी (४०) हा पसार झाला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ११,०००/- रु.रोख रक्कम व ११,०००/- रु.किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण २२,०००/- रु.किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे असून त्याच्यावर गुन्हा रजि.क्र.: १५/२०२४ भा.द. वि. सं कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर यशस्वी कामगिरी मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई, कल्याण विभाग, सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जावळे, पोलीस हवालदार कुटे, मोहिते व त्यांच्या पथकाने केली.अटक आरोपीवर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तसेच कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याचे कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दैनिक पोलीस महानगर शी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon