डोंबिवलीतील सेवन स्टार बार अँड रेस्टॉरंट मध्ये दोन गटात राडा ; गोळीबारात तरुण जखमी
फिल्मी स्टाईलने पाठलाग करून दोन तासातच आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या
डोंबिवली – येथील पूर्व परिसरात रात्रौ दीड च्या सुमारास मानपाडा पोलीस स्टेशनला दोन गटात राडा झाला असल्याचा दूरध्वनी वर कॉल आला. मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक व्होनमाने आपल्या सहकारयांसोबत सेवन स्टार या बार अँड रेस्टॉरंट मध्ये पोहचले असता तिथे विकास भंडारी हा गोळीबारात जखमी झाल्याने त्याला जवळच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, सेवन स्टार बार अँड रेस्टॉरंट मध्ये दारू पिताना विकास भंडारी यांच्याकडून दुसऱ्या गटाच्या अजय सिंग याला खुर्चीचा धक्का लागल्याने दोन गटात वाद सुरू झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, अजय सिंग याने आपल्याकडील पिस्तुल काढून अंकुश भंडारी याचेवर गोळीबार केला. या गोळीबारात भंडारी हा जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारानंतर सिंग व त्याचे साथीदार यांनी तेथून पळ काढला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक व्होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पळून गेलेल्या ५ जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. सदरचे ५ ही आरोपी हे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.सदर गुन्हाच्या अधिक तपास पोलीस करीत आहेत.