भाजपा आमदार सुनील कांबळे याचा प्रताप ; कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाच्या लगावली कानशिलात
पुणे – भारतीय जनता पक्षाचे महा प्रतापी आमदार सुनील कांबळे याने एकाच कार्यक्रमात दोघांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
पुण्याच्या ससून रुग्णालयात तृतीय पंथी यांना एक वेगळा वॉर्ड निर्माण करण्यात आला आहे,त्याचा उद्घाटन कार्यक्रम पुणाचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले त्या कार्यक्रमात हसन मुश्रीफ व सुनील तटकरे उपस्थित होते, त्यावेळी भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी प्रथम राष्ट्रवादीच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख सातव यांना नाव नसण्याचा कारणावरून मारहाण केली त्यानंतर तिथून निघताना बंदोबस्तात असणाऱ्या व आपले कर्तव्य निभावणाऱ्या शिवाजी सरफ या पोलिसाच्या कानशिलात लगावली.
भाजपच्या या महाप्रतापी आमदारावर राज्याचे गृहमंत्री कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.