ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या मुख्याध्यापिकेला लाच स्वीकारताना अटक

Spread the love

ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या मुख्याध्यापिकेला लाच स्वीकारताना अटक

धुळे – अधिकाऱ्याने लाच घेतली अशी अनेक उदाहरणे आपण नेहमीच ऐकतो, व ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणाऱ्या व्यक्तीने लाच घेतली हे आपण फार कमी ऐकतो. एका मुख्याध्यापिकेने लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्चना बापूराव जगताप असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, अक्कलकोस, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे यांना तक्रारदार यांचे कडून ५०००/-रु.लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४०००/-रु.लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे त्याच आश्रमशाळेत माध्यमिक शिक्षक या पदावर असताना सेवानिवृत्त झाले. गट विमा योजनेचे मंजूर झालेले १,३३,४८४/- रु.बिल तक्रारदार यांना अदा करण्यासाठी उपकोषागार कार्यालय, शिंदखेडा येथे पाठविण्यासाठी श्रीमती अर्चना जगताप या ५०००/-रु.लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात दूरध्वनीवरून माहीती दिली.

तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांना ४०००/-रु.ची लाच स्वीकारताना पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध दोंडाई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी आणि त्याच्या सहकरी पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon