उल्हासनगरमध्ये टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

Spread the love

उल्हासनगरमध्ये टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

उल्हासनगर – उल्हासनगरमधील कॅम्प ५ परिसरात गांधी नगर, हॉली चाईल्ड कॉन्व्हेंट शाळेच्या जवळ असलेल्या कपड्याच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या नदीम मुनिर शेख नावाच्या कामगाराला त्याच दुकानात काम करणाऱ्या नितीन यादव, त्याचा भाऊ बादल यादव व ६ ते ८ लोकांनी बेदम मारहाण केली.

१ जानेवारी रोजी कपड्याच्या दुकानात काम करीत असताना कपडा कटिंग करण्यावरून नदीम शेख व नितीन यादव यांच्यात वाद झाला होता,याचाच बदला म्हणून त्याच दिवशी सायंकाळी नितीन यादव व त्याच्या साथीदारांनी दारू पिऊन येऊन व तोंडावर रुमाल बांधून नदीम यास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली यात नदीम शेख च्या डोक्याला प्रचंड इजा झाली असून त्याच्या डोक्यावर ६ टाके घालण्यात आले आहेत.सध्या तो उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेत आहे. नदीम यास मारहाण करणारे नितीन यादव, त्याचा भाऊ बादल यादव व इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon