वॉन्टेड ड्रग तस्कराला जोगेश्वरी पोलिसांकडून अटक, दहा लाख रुपये किमतीचे शंभर ग्रॅम एमडी जप्त
योगेश पांडे
मुंबई – ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीचा शोध घेत पोलिसांनी जोगेश्वरी परिसरातून एकाला अटक केली असून त्याच्याकडून पोलिसांनी दहा लाख रुपये किमतीचे शंभर ग्रॅम एमडी जप्त केले आहे. फैसल अकबर मखनोजा (३४) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांना पाहताच फैसल पळण्याच्या तयारीत होता. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना त्याच्याकडे दहा लाख रुपये किंमतीचे एमडी ड्रग्ज, वीस हजारांचा मोबाईल आणि पाचशे रुपये सापडले. चौकशीत त्याने संबंधित एमडी ड्रग्ज विकण्यासाठी आणल्याची कबुली दिली. त्याला ड्रग्ज कोणी दिले, तो ते कोणाला विकणार होता, याआधीही त्याने एमडी ड्रग्जची विक्री केली आहे का इत्यादी बाबींचा तपास आता पोलिस करत आहेत.