कल्याण वाहतूक विभागातर्फे वाहतूक नियम मोडणाऱ्या हजारो वाहनचालकांवर लाखोंची दंडात्मक कारवाई
५८८० पेक्षा वाहन चालकांकडून ५४,७९,६००/- रुपयांचा दंड वसूल
विशेष प्रतिनिधी
कल्याण – कल्याण वाहतूक विभागाकडून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वाहतूक नियमम करताना नियम धाब्यावर बसवून वाहन चालविणारयांवर कारवाई करण्यासाठी दि.२६ डिसेंबर ते १ जानेवारी पहाटे पर्यंत ड्रंक अँड ड्राईव्ह, ट्रिपल सीट, विना परवाना वाहन चालक, अति वेगाने वाहन चालवणे यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कल्याण, कोळसेवाडी व डोंबिवली परिसरातील नागरिकांना नवीन वर्षांचा आनंद लुटण्यासाठी, कोणतेही अपघात होऊ नये यासाठी वाहतूक विभाग दक्षता घेत असताना व वाहतूक नियमन करताना दारू पिऊन गाडी चालविणे, ट्रिपल सीट, विना परवाना वाहन चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह चे १८७ गुन्हे व ५८८० वाहन चालकांवर इतर गुन्हे दाखल करण्यात आले.
मद्य प्रश्न करून नशेतच वाहन चालविण्याच्या घटना अधिक प्रमाणात घडतात. यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त व वाहतूक पोलीस उपायुक्त यांच्या आदेशानुसार कल्याण वाहतूक पोलिसांच्या वतीने ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची मोहीम हाती घेण्यात आली होती. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्साहाच्या भरात वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या, स्वताच्या व नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. कल्याण विभागातील सर्व नागरिकांना कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी दैनिक ‘पोलीस महानगर’ शी बोलताना परिसरातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.