कल्याण पूर्वेत लीव्ह इन रिलेशनच्या वादातूनन 38 वर्षीय महिलेची हत्या
हत्या करणारा आरोपी विजय जाधव याला ठोकल्या बेड्या
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण : कल्याण कोळसेवाडी परिसरात लीव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहणाऱ्या रिक्षा चालकाने चारित्र्याचा संशय घेत 38 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केल्याची घटना घडली असून हत्याची माहिती मिळताच कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत अवघ्या काही तासात हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्यात विजय जाधव असे या आरोपीचे नाव असून रसिका कोळंबेकर असे मृत तरुणीचे नाव आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.