कल्याण गुन्हे शाखेने 24 तासाच्या आत बंदर पाडात गोली झाडणार्या आरोपीला अटक केली
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण :– कल्याण येथील बंदर पाडा परिसरात एका तरुणावर त्याच्याच मित्राने गोळी झाडून त्याला गंभीर जखमी करत घटनास्थळावरून पळ काढला होता. कल्याण गुन्हे शाखेने 24 तासाच्या आत आरोपी उमेश खानविलकर (वय 30) याला अटक केली आहे. उमेशा रेल्वेने बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्या आधीच पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवडल्या आहेत जुन्या भांडणाच्या वादातून उमेशने हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याणच्या बंदर पाडा परिसरात बुधवारी सायंकाळी सुशील महंतो आणि त्याचे चार ते पाच मित्र एकत्र बसले होते. यावेळी सुशील व उमेश यांच्यात झालेला जुन्या भांडणाचा वाद पुन्हा उफाळून आला. या रागात उमेश याने त्याच्या जवळ असलेल्या गावठी कट्ट्यातून सुशील याच्यावर गोळी झाडली.
यावेळी सुशीलने हात आडवा केल्याने त्याच्या हाताचा पंजा फाडून ही गोळी त्याच्यात तोंडात गेली. त्याच्यावर उपचार सुरू असून याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. याचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखा घटक 3 यांच्या वतीने करण्यात येत होता.
कल्याण मुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहूल म्हस्के, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक संजय माळी, पोलीस हवालदार किशोर पाटील, रमाकांत पाटील, अनुप कामत, कडु, पोलीस शिपाई, गुरुनाथ जरग, विनोद चन्ने, मिथुन राथोड यांच्या पथकाने तपास सुरू केला.
गुप्त बातमीदारमार्फत पोलिसांना आरोपी उमेश हा रेल्वेने बाहेरगावी पळून जाणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार शहाड येथील रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांनी सापळा रचत मध्यरात्री 1 च्या सुमारास अटक केली.
पोलिसांनी त्याच्याकडून गुन्हा करताना वापरलेले हत्यार एक गावठी बनावटीचे पिस्टल त्यात एक जिवंत काडतुस तसेच मोबाईल, पॅन कार्ड असा एकूण 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याच्यावर कलम 307, कलम 4 व 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.