डोंबिवली मानपाडा पोलीसांनी ९९ हजारांचा गुटखा जप्त केले

Spread the love

डोंबिवली मानपाडा पोलीसांनी ९९ हजारांचा गुटखा जप्त केले

दिनेश जाधव : डोंबिवली

डोंबिवली : दुचाकीच्या आसनाखाली असलेल्या पेटीत गुटख्याचा साठा घेऊन कल्याण-डोंबिवली परिसरातील पान टपरीच्या चालकांना चोरुन विकणाऱ्या अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील दुचाकीस्वारासह टपरीवाल्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून ९९ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.

काटई-बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या म्हाडा कॉलनीजवळील आवणी पान शाॅपमध्ये गुटख्याची विक्री करत असताना इसम गस्तीवरील पोलिसांच्या जाळ्यात अडकला. दुचाकीच्या पेटीत गुटखा ठेऊन त्याची डोंबिवली परिसरातील पान टपऱ्यांवर विक्री करणाऱ्या इसमाचे नाव सुनीलकुमार मिश्रा आहे. तो अंबरनाथ तालुक्यातील व्दारली गावात राहतो, असे पोलिसांनी सांगितले. मिश्राकडून गुटखा खरेदी करत असताना खोणी गावाजवळील म्हाडा वसाहतील जवळील आवणी पान टपरीचा चालक बृजुलकुमार इन्दीपकुमार सिंग (२७) पोलिसांच्या सापळ्यात अडकला.

एक इसम मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात दुचाकीवरून गुटख्याची विक्री करत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अशा संशयास्पद दुचाकी चालकाच्या मागावर होते. शुक्रवारी दुपारी हवालदार शांताराम कसबे आणि त्यांचे सहकारी खोणी भागात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एक दुचाकीस्वार संशयास्पदरित्या हालचाली करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी थांबवून त्याला कोठे चालला आहे. तु कोठे राहतो ? अशी विचारणा केली. उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्याच्या दुचाकीची पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. हा साठा पानटपरी चालकांना विकत असल्याची कबुली सुनीलकुमार मिश्रा याने पोलिसांना दिली. गुटखा विक्रेता मिश्रा आणि आवणी पान टपरीचा मालक बृजुलकुमार सिंग यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात हवालदार शांताराम कसबे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत काळात ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता, पत्रीपूल भागातील पान टपरींवर गुटख्याचे गोरख धंदे सुरू होते. हे धंदे टिळकनगर पोलिसांनी अचानक छापे मारुन बंद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon