कल्याण मध्ये सात लाखाचे एमडी जप्त
अटकेत नायजेरियन सह इराणी महिलेचा समावेश
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण : कल्याण झोन 3 पोलिसांनी आमली पदार्थ विरोधात कमर कसली असून कल्याण कोळसेवाडी आणि खडकपाडा पोलिसानी एकाच दिवशी मोठी कारवाई करत ७ लाख १५ हजार रुपयाचा MD नावाचा ड्रक्स सह चार आरोपीना केली अटक केली आहे यात नायजेरियन सह महिला इराणीचा समावेश आहे.
कल्याण पूर्वेतिल १०० फूटी रोडवर नाकाबंदी दरम्यान एक रिक्षा पोलिसांना पाहून पळवली जात असल्याने पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करत या रिक्षातील दोन तरुणांची अंग झडती करत तपास केला असता त्यांच्याकडे ५.६ ग्राम वजनाचा ३३ हजार ६०० रुपयाचा एम डी हा मादक पदार्थ सापडल्याने त्या दोघांना अटक करण्यात आली. या आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी नवी मुंबईतील चुकवू इमेका जोसेफ इमेका या ४२ वर्षीय व्यक्तीकडून हा अमली पदार्थ खरेदी केला असून कल्याण पूर्वेत त्याची विक्री करणार असल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी नवी मुंबईतील वाशी परिसरातून सदर नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्याकडील २७९ ग्राम वजनाचा ५ लाख ५८ हजार रुपये किमतीचा एम डी जप्त केला आहे. या तिघांनाही अटक करण्यात आली असून याच दरम्यान खडकपाडा पोलिसानी आंबीवली परिसरात केलेल्या कारवाईत फिजा इराणी या महिलेकडे ३४ ग्राम एम डी जप्त केले या अमली पदार्थांची बाजारातील किमत ६८ हजार रुपये इतकी असून या अमली पदार्थांची एकत्रित रक्कम ७ लाख १५ हजार रुपये इतकी आहे. कल्याणात प्रथमच इतकी मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती कल्याण Acp कल्याणजी घेटे यांनी दिली असून पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहे.