पुन्हा एकदा मध्य रेल्वे खोळंबली; सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे लोकलच्या लांबच लांब रांगा

पुन्हा एकदा मध्य रेल्वे खोळंबली; सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे लोकलच्या लांबच लांब रांगा

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – नोकरदारांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. सोमवारी सकाळी कल्याण- ठाणे लोकल सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत असताना आता अशातच मंगळवारी पुन्हा दुपारी सुद्धा पुन्हा एकदा रेल्वे सेवेमध्ये खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली.

मस्जिद बंदर आणि मुंबई सीएसएमटी स्थानकादरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकलच्या लांबच लांब रांगा लागलेल्या. कल्याण ते मुंबई सीएसएमटी स्थानका दरम्यान धावणारी जलद लोकल मस्जिद बंदर रेल्वे स्टेशनच्या अलीकडे थांबवण्यात आली. सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल थांबवण्यात आली. लोकलमध्ये सतत बिघाड होत असल्यामुळे रेल्वे प्रवाशांनी रेल्वे ट्रॅक वरून पुढचं रेल्वे स्टेशन गाठलं.

खरंतर, सिग्नल यंत्रणेमध्ये खूप मोठा मेजर इश्श्यू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्र. ५ स्थानकावर आधीच एक लोकल उभी होती. त्याचवेळी बदलापूरवरून येणारी लोकलही जी प्लॅटफॉर्म क्र. ४ वर जाणं अपेक्षित होतं. पण, सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे किंवा इतरत्र तांत्रिक काही कारणामुळे बदलापूर लोकल प्लॅटफॉर्म क्र. ५ वर चालली होती. त्यामुळे एकाचवेळी एकाच रूळावर दोन दोन लोकल समोरासमोर येऊन उभ्या ठाकल्या.

या मोठ्या तांत्रिक बाबीमुळे सीएसएमटी स्थानकावर मोठी दुर्घटना टळली. सोमवारी सकाळी डोंबिवली स्थानकावरून कल्याणकडे जात असलेली धीम्या मार्गावरील लोकलचा एक डब्बा रुळावरून खाली घसरला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकल वाहतूकीमध्ये मोठा खोळंबा झाला होता. त्याप्रमाणेच मंगळवारी सकाळी देखील लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती. सतत वाहतुकीमध्ये होत असलेल्या खोळंब्यामुळे नोकरदार या समस्येला कमालीचे संतापले आहेत. सततच्या लोकल उशीरा धावत असल्यामुळे नोकरदारांनी थेट रूळावरूनच स्टेशनचा रस्ता गाठले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon