माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधन प्रकरणावरून रोहित पवार, अमोल मिटकरींची पोलिसांसोबत बाचाबाची; विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – बुधवारी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी हे आक्रमक झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती निधन झालं, याबाबत पुरावे असताना पोलीस कारवाई का करत नाहीत, असा सवाल त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन उपस्थित केला. यावेळी पोलीस ठाण्यामध्ये बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार आणि अमोल मिटकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले. इतके पुरावे आहेत सगळे न्यूजमध्ये सगळं आलेलं आहे, कारवाई का केली जात नाही, पोलीस ठाण्यामध्ये हे नेते आक्रमक झाल्याचे दिसून आले.
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार, अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर आक्रमक झालेले आहेत, डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी यांच्यावरोधात तात्काळ तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी या नेत्यांची आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती निधन झालं आहे. त्यामुळे फक्त कारवाई करू अशी आश्वासन नको आहेत. तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील या नेत्यांनी केली आहे.
डीजीसीएच्या अहवालामध्ये देखील व्हिएसआर कंपनीची चूक होती ती समोर आली आहे, कंपनीचा निष्काळजीपणा देखील समोर आला आहे. या दोघांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा प्रामुख्याने दाखल करावा आणि यामध्ये दोघांचाही समावेश आहे, अपघात झाला त्यावेळी डीजीसीएकडून हा अपघात असल्याचं म्हटलं होतं, मात्र दुसरीकडे व्हिएसआर कंपनीचा जो निष्काळजीपणा होता, मेंटेनन्स ठेवलेला नव्हता हे समोर आल्यानंतर या दोन्ही संस्थाच्या संबंधित अधिकाकाऱ्यांवरती देखील गुन्हा दाखल कराला या मागणीसाठी रोहित पवार आक्रमक झाल्याचे दिसून आले. या ठिकाणी पोलिस देखील आहे, एकूण वातावरण तापल्यां दिसून येत आहे. कार्यकर्त्यांना पोलिस केबिनच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे, पोलिसांच्या केबिनमध्ये फक्त अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर, रोहित पवारांसह त्यांचे वकील उपस्थित आहे.त्यांच्याशी प्रवीण मुंडे चर्चा करताना दिसत आहेत, कायदेशीर कारवाई होईल आणि ती कायद्याच्या चौकटीत केली जाईल असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे, मात्र रोहित पवार अमोल मिटकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.