वडिलांच्या मंत्रिपदावर शेकताच मुलगा पोलिसांना शरण; विकास गोगावले दीड महिन्यांनंतर ‘हजर’

Spread the love

वडिलांच्या मंत्रिपदावर शेकताच मुलगा पोलिसांना शरण; विकास गोगावले दीड महिन्यांनंतर ‘हजर’

योगेश पांडे / वार्ताहर

रायगड – महाड नगर पालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणामुळे चर्चेत असलेले आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले अखेर पोलिसांना शरण आले आहेत. मागील दीड महिन्यांपासून फरार असलेले विकास गोगावले शुक्रवारी महाड शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. न्यायालयाच्या कडक आदेशानंतर त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

महाड नगर पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन राजकीय गटांत मोठा राडा झाला होता. या हिंसाचार आणि राडा प्रकरणात विकास गोगावले यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यापासून विकास गोगावले अटकेच्या भीतीने फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी केली होती, मात्र ते सापडले नव्हते.

विकास गोगावले यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र गुरुवारी न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत, तातडीने पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिले होते. मुलावर एवढे गंभीर गुन्हे असताना भरत गोगावले मंत्रिपदी कसे, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. न्यायालयाच्या या आदेशानंतर त्यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता.

आमदार भरत गोगावले हे सत्ताधारी पक्षातील वजनदार नेते असल्याने, त्यांच्या मुलाने पोलिसांसमोर केलेले आत्मसमर्पण हा महाडच्या राजकारणात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.पोलीस त्यांना अटक करत न्यायालयासमोर हजर करून त्यांची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon