रत्नागिरी रेल्वे हद्दीत मेल-एक्सप्रेसमधील चोरीचा पर्दाफाश; आरोपीकडून ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

रत्नागिरी रेल्वे हद्दीत मेल-एक्सप्रेसमधील चोरीचा पर्दाफाश; आरोपीकडून ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस महानगर नेटवर्क

रत्नागिरी – रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या सुमारास मेल व एक्सप्रेस गाड्यांतील प्रवाशांचे सोन्याचे दागिने व पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला मुंबई लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून ४२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सुमारे ५ लाख २ हजार रुपये किमतीचे तसेच इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

या अटकेमुळे रत्नागिरी रेल्वे हद्दीत घडलेल्या एकूण ८ चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. आरोपी रात्रीच्या वेळी गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या झोपेत असताना सोन्याचे दागिने व पर्स चोरण्याची पद्धत अवलंबत होता. गुन्हे शाखेने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या आधारे सापळा रचून ही यशस्वी कारवाई केली. या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत असून, रेल्वे पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon