निहारिका सोसायटीत जेष्ठ नागरिकांसाठी जनजागृती सभा; चेन स्नॅचिंग व ऑनलाईन फसवणुकीबाबत मार्गदर्शन
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – निहारिका सोसायटी येथे जेष्ठ नागरिक व रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत चेन स्नॅचिंग, ऑनलाईन फसवणूक, सायबर गुन्हे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदाऱ्या, संशयास्पद कॉल, लिंक व QR कोड्सपासून कसे सावध राहावे, याबाबत सखोल माहिती देण्यात आली.
यावेळी सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी पोलिस विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या अधिकृत नवीन QR Codes बाबतही नागरिकांना माहिती देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत कशी मिळवता येईल, याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या उपक्रमाचे जेष्ठ नागरिक व रहिवाशांनी स्वागत करत उपयुक्त मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले.