ठाण्यात कॉस फाऊंडेशनतर्फे विद्यार्थी सुरक्षा व जागरूकता सत्र; १६० पेक्षा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Spread the love

ठाण्यात कॉस फाऊंडेशनतर्फे विद्यार्थी सुरक्षा व जागरूकता सत्र; १६० पेक्षा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे – कॉस फाऊंडेशन यांच्या उपक्रमांतर्गत एम.एच. हाईस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, ठाणे येथे विद्यार्थी सुरक्षा व जागरूकता सत्राचे आयोजन करण्यात आले. ११वी–१२वीतील १६० हून अधिक विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सुरक्षा, जागरूकता, शिस्त, ऑनलाइन सुरक्षितता आणि योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व सोप्या व प्रभावी उदाहरणांद्वारे सांगण्यात आले.

पोलीस अधिकारी उपस्थित:
• श्री. अभय महाजन – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे
• हेड कॉन्स्टेबल शेलके – नौपाडा पोलीस ठाणे

शाळा प्रतिनिधी:
• श्री. विकास पाटील – प्राचार्य
• श्री. सतीश घोलप – समन्वयक

कॉस फाऊंडेशन टीम:
• श्री. जितेश मोरे – संचालक
• सौ. कल्पना मोरे – संस्थापक
• श्री. सूरज कदम
• सौ. भाग्यश्री मनोरे

कार्यक्रमात सहभागी सर्वांनी एकत्रितपणे सुरक्षित, जागरूक आणि सक्षम विद्यार्थी घडवण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon