नौपाडा पोलिसांची तत्पर कामगिरी; रिक्षात विसरलेले १५ तोळ्यांचे दागिने शोधून मालकिणीला परत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : पोलिसांच्या तत्परतेमुळे एका महिलेचे १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने सुरक्षितपणे परत मिळाले आहेत. वसंत विहार ते नौपाडा, ठाणे या प्रवासादरम्यान महिलेची दागिन्यांची बॅग रिक्षात विसरली गेली होती.
घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरातील CCTV फूटेज तपासून रिक्षाचा शोध घेतला. शिताफीने केलेल्या तपासानंतर पोलिसांनी संबंधित रिक्षा शोधून काढली आणि त्यामधील १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने हस्तगत करून महिलेच्या ताब्यात सुपूर्द केले.
नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वृद्धिंगत करणारी ही नौपाडा पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी असल्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.