मुंबई महापालिकेच्या वॉर्डसाठी आरक्षण सोडत जाहीर; अनेक दिग्गज नगरसेवकांच्या मतदारसंघांवर थेट परिणाम
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता मुंबई महापालिकेच्या वॉर्डसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या आरक्षण सोडतीने अनेक प्रमुख राजकीय पक्षांच्या समीकरणामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूण २२७ प्रभागांसाठी झालेल्या या सोडतीत अनेक दिग्गज विद्यमान आणि माजी नगरसेवकांच्या मतदारसंघांवर थेट परिणाम होणार आहे.
या आरक्षण सोडतीचा सर्वात मोठा फटका ठाकरे गटाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या सून तेजस्विनी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक १ आता मागासवर्ग प्रवर्ग (OBC) म्हणून आरक्षित झाला आहे. तेजस्विनी घोसाळकर गेल्या काही दिवसांपासून या वॉर्डात निवडणुकीची तयारी करत होत्या. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मिलिंद वैद्य यांचा वॉर्ड क्रमांक १८२ हा आधी सर्वसाधारण गटात होता. तो आता ओबीसी (मागासवर्ग प्रवर्ग) म्हणून आरक्षित झाला आहे.
मुंबई महापालिकेत आरक्षण कसे असणार?
प्रवर्ग एकूण जागा महिलांसाठी राखीव जागा सर्वसाधारण (खुला गट) १४९ आणि ७४,नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) ६१ व ३१
अनुसूचित जाती (SC) १५ ८
अनुसूचित जमाती (ST) २ १
एकूण २२७- ११४.
अनुसूचित जाती (SC) करिता आरक्षित प्रभाग