मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्षाची भव्य कारवाई; तब्बल ₹८०.५६ कोटींच्या ड्रग्जचा नाश!
वर्षातील दुसरी मोठी मोहीम; १६२ किलो अंमली पदार्थ आणि ७,९०८ बाटल्या नष्ट
सुधाकर नाडार/ मुंबई
मुंबई – अंमली पदार्थ विरोधी कक्षाने पुन्हा एकदा मोठी कामगिरी करत तब्बल ₹८०.५६ कोटी किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे. आज, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी, अंमली पदार्थ विरोधी कक्ष आणि गुन्हे शाखा, मुंबई पोलिसांनी एकत्रित मोहिमेत १६२ किलो अंमली पदार्थ आणि ७,९०८ कोडीन मिश्रित बाटल्या अधिकृतरीत्या जाळून नष्ट केल्या. ही कारवाई महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड, एमआयडीसी तळोजा (ता. पनवेल, जि. रायगड) येथील बंदिस्त भट्टीत करण्यात आली.
नष्ट करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये,
१४४.३१० किलो गांजा
८.२१६ किलो चरस
६.०४८ किलो कोकेन
२.१९७ किलो एम.डी. (मेथेड्रोन)
१.६७९ किलो हेरॉईन
७,९०८ कोडीन मिश्रित बाटल्या
या सर्व अंमली पदार्थांचा समावेश अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मुंबई अंतर्गत दाखल झालेल्या ५९ गुन्ह्यांमधून जप्त केलेल्या मालामध्ये होता.
याआधी मे २०२५ मध्ये, मुंबई पोलिसांनी ₹५०.३० कोटी किंमतीचे ५३० किलो अंमली पदार्थ आणि ४,४३३ कोडीन मिश्रित बाटल्या नष्ट केल्या होत्या.
आजच्या मोहिमेसह, या वर्षात एकूण;
६९२ किलो अंमली पदार्थ आणि १२,३४१ कोडीन मिश्रित बाटल्या, एकत्रित ₹१३०.८६ कोटींचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
ही कारवाई श्री. देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. लखमी गौतम, पोलीस सहआयुक्त (गुन्हे)
आणि श्री. सत्य नारायण, पोलीस सहआयुक्त (गुन्हे व सुरक्षा) यांच्या सहकार्याने पार पडली.
या मोहिमेची जबाबदारी ड्रग डिस्पोजल कमिटीने सांभाळली.
अध्यक्ष श्री. सत्य नारायण, पोलीस सहआयुक्त (गुन्हे व सुरक्षा)
सदस्य, श्री. शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. नवनाथ ढवळे, पोलीस उपायुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष), श्री. सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष) प्रक्रियेदरम्यान कलीना येथील रासायनिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.
या ऑपरेशनचे प्रत्यक्ष संचालन प्रभारी पोलीस निरीक्षक (भांडारगृह) राहुल लोखंडे,
स.फौ. शेडगे, स.फौ. चाळके, म.पो.शि. जेठे आणि पो.शि. समाधान जाधव यांनी केले अंमली पदार्थमुक्त समाजाच्या दिशेने बृहन्मुंबई पोलीस दल सातत्याने पावले उचलत असून, आजची ही कारवाई त्या लढ्यातील एक महत्त्वपूर्ण व निर्णायक टप्पा ठरला आहे.