वडाळ्यात मोटारसायकल चोरीत सराईत आरोपी अटक; ३ मोटारसायकल जप्त!
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – वडाळा टी टी पोलीसांनी मोटार वाहन चोरीत गुन्हेगार जैद मोहम्मद आलम खान (वय २५) यास अटक केली आहे. आरोपीतावर मुंबई पोलीस ठाणे हद्दीत आधीच नोंद असलेला जुना गुन्हेगार आहे. घटना ६ ऑक्टोबर २०२५ रोजी वडाळा आरटीओ कार्यालयाजवळील वडाळा ट्रक टर्मिनल रोड येथे घडली. फिर्यादी श्री. मोहम्मद अनीस खान (वय १९) यांची मोटर स्कूटर पार्क केलेली असताना कोणीतरी अज्ञात इसमांनी त्यांच्या संमतीशिवाय चोरी केली. त्यानंतर गु.र.क्र. ६८४/२०२५, कलम ३०३(२) भा.न्या.स. २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
तपासात गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा मागोवा घेतला गेला आणि मुंबईबाहेर पळण्याच्या तयारीत असताना आरोपीला अटक केली. चौकशीत आरोपीने सदर चोरीची कबुली दिली आणि आधीच नोंदलेल्या गुन्ह्यांमध्येही तीन मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले.
या कारवाईत वडाळा टी टी पोलीस ठाणे (गु.र.क्र. ६८६/२०२५) आणि अॅन्टॉपहिल पोलीस ठाणे (गु.र.क्र. ५२०/२०२५) या गुन्ह्यांतर्गत एकूण ३ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. वडाळा पोलीसांची ही कारवाई शहरात मोटार वाहन चोरीविरुद्धचा एक महत्वाचा टप्पा आहे.
सदरची कामगिरी ही श्री देवेन भारती, मा पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री सत्यनारायण चौधरी, मा पोलीस सह आयुक्त (का व सु), बृहन्मुंबई, श्री विक्रम देशमाने, मा अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई, श्रीमती रागसुधा आर. मा पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०४, मुंबई, श्री शैलेंद्र धिवार, मा सहायक पोलीस आयुक्त, सायन विभाग, मुंबई, श्री मनिष आवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वडाळा टी टी पोलीस ठाणे, मुंबई यांच े मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक – माधवेंद्र येवले, पो. हवा. गोसावी, पो. हवा. कुटे, पो.शि.शेख, पो.शि.बटूळ यांनी केलीआहे.