नाशिक – जीएसटी व सेंट्रल एक्साईज अधीक्षक सीबीआयच्या ताब्यात; मागितली तब्बल लाखोंची लाच
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – नाशिकमधील जीएसटी आणि सेंट्रल एक्साईज विभागातील अधीक्षक शर्माला पाच लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने अटक केली आहे. पुणे न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना १७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
निफाड तालुक्याच्या वणी येथील एका उद्योजकावर कारवाई टाळण्यासाठी अधीक्षक शर्माने ५० लाख रुपयांची लाच मागितली होती. उद्योजकाने एवढी मोठी रक्कम न देण्याचा निर्णय घेतल्याने, शेवटी २२ लाख रुपये देण्याचे ठरले. ही माहिती सीबीआयच्या लाचलुचपत पथकाकडे मिळाली.
सीबीआयच्या पथकाने १४ ऑक्टोबर रोजी रात्री पाच लाख रुपयांची लाच घेत असतानाच अधीक्षक शर्माला अटक केली. त्यांच्या घराची तपासणी केली असता, १९ लाख रुपये रोकड आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली, जी जप्त करण्यात आली आहेत.
अटक नंतर पुणे न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.