सायबर सुरक्षिततेकडे सजग पाऊल; कोनगाव पोलिसांकडून नाकोडा कर्णबधीर विद्यालयात जनजागृती
पोलीस महानगर नेटवर्क
सरवली – डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कोनगाव पोलिस ठाण्याच्यावतीने नाकोडा कर्णबधीर विद्यालय, सरवली येथे सायबर सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना सायबर फसवणूक, ओटीपी शेअरिंग, बनावट केवायसी, सेक्सटॉर्शन, डिजिटल ब्लॅकमेल यांसारख्या गंभीर गुन्ह्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत सजगता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणे असे असून, उपस्थित सर्वांनी सायबर सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.