चुनाभट्टी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : १८३ चोरीचे मोबाईल हस्तगत, ८ आरोपी अटकेत

Spread the love

चुनाभट्टी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : १८३ चोरीचे मोबाईल हस्तगत, ८ आरोपी अटकेत

रवि निषाद / मुंबई

चुनाभट्टी पोलिसांनी मोठी कामगिरी करत मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल १८३ मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, त्यांची एकूण किंमत ३० लाख ४८ हजार १० रुपये इतकी आहे. याप्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी ६ आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई परिमंडल ६ चे पोलिस उपायुक्त मा. श्री. समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट २०२५ रोजी एका युवकाने मोबाईल चोरीची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी मानवी व तांत्रिक तपासाची सांगड घालत, सचिन लक्ष्मण गायकवाड, तौसीफ अयूब सिद्दीकी, अमर गौरीलाल शंकर, निसार आशिक हुसेन आलम, सादिक अली मैनूँद्दीन शेख आणि मुर्शिद मंसूर सिद्दीकी या आरोपींना मुंबई व नवी मुंबई परिसरातून अटक केली.

सदर कारवाईत अजून सहा आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे.

या धाडसी कामगिरीचे मार्गदर्शन पोलिस आयुक्त मा. देवेन भारती, सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण चौधरी, अपर पोलिस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) डॉ. महेश पाटील आणि परिमंडल ६ चे पोलिस उपायुक्त श्री. समीर शेख यांनी केले.

तर चुनाभट्टी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या देखरेखीखाली एपीआय स्वप्निल डमरे, पीएसआय अजय गोल्हार व त्यांच्या पथकाने ही संपूर्ण कारवाई यशस्वीरीत्या केली. या कारवाईमुळे मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला असून, नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon