निजामपुरा पोलीस ठाणेच्या सायबर पथकाची उत्कृष्ट कामगिरी; ३५ मोबाईल नागरिकांच्या हवाली!
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या ठाणे पोलिसांनी पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. निजामपुरा पोलीस ठाणेअंतर्गत कार्यरत सायबर पथकाने हरवलेले ३५ मोबाईल फोन शोधून काढले असून हे मोबाईल त्यांच्या खऱ्या मालकांच्या हवाली करण्यात आले.
अनेकदा चोरी किंवा हरवलेल्या मोबाईलमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागते. मात्र पोलिसांच्या सायबर पथकाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही यशस्वी मोहीम राबवली. तब्बल लाखोंच्या किमतीचे हे मोबाईल अल्पावधीतच शोधून काढल्याने नागरिकांमध्ये समाधानाची लाट आहे.
मोबाईल हस्तांतर सोहळा नुकताच पोलीस ठाण्यात पार पडला. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांना मोबाईलचा सुरक्षित वापर करण्याचे आणि कोणतीही घटना घडल्यास त्वरित पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले.
या यशस्वी कारवाईमुळे निजामपुरा पोलीस ठाणे व सायबर पथकाबद्दल नागरिकांत विश्वास अधिक दृढ झाला आहे. ठाणे पोलिसांच्या दक्षतेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतचा संदेश अधिक ठळकपणे अधोरेखित झाला आहे.