कोनगाव पोलिसांचा कौतुकास्पद पराक्रम : हरवलेली ३ वर्षीय चिमुकली सुखरूप सापडली
पोलीस महानगर नेटवर्क
कोनगाव : केवळ ३ वर्षांची बालिका हरवल्याची माहिती मिळताच कोनगाव पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाने तात्काळ शोधमोहीम राबवली. अवघ्या काही वेळातच मुलीचा शोध लागला व तिला सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आलं. या तत्पर व संवेदनशील कार्यामुळे नागरिकांकडून कोनगाव पोलिसांच्या या कामगिरीचं मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं जात आहे.
हरवलेल्या मुलांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारची पोलिसांची जलद कारवाई ही स्थानिकांसाठी दिलासादायक ठरते.