ठाणे पोलिसांचा नवा उपक्रम : ‘स्मार्ट HQ मॅनेजमेंट अॅप’मुळे कामकाज अधिक पारदर्शक
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – पोलिसांच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी ठाणे पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘स्मार्ट HQ मॅनेजमेंट अॅप’च्या माध्यमातून आता पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती, ड्युटी लोकेशन तसेच कार्यपद्धतीवर थेट ऑनलाईन नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
या नव्या प्रणालीमुळे –
पोलिस कर्मचार्यांचे लाईव्ह लोकेशन पाहता येणार
मोबाइलवरून त्वरित सर्व तपशील उपलब्ध होणार
कामकाज अधिक शिस्तबद्ध व पारदर्शक राहणार
ठाणे पोलिसांच्या या उपक्रमामुळे दलाच्या कार्यक्षमतेत मोठा बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.