माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीला लावला ८२ कोटींचा चुना, चोरलेल्या पैशांनी केलं मोठं सायबर फ्रॉड

Spread the love

माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीला लावला ८२ कोटींचा चुना, चोरलेल्या पैशांनी केलं मोठं सायबर फ्रॉड

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – हिंजवडी आयटी नगरीतील फ्युचरीइम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीतील माजी कर्मचाऱ्यांनी गोपनीय सोर्स कोड आणि सॉफ्टवेअर सोल्युशनची माहिती चोरून कंपनीचे तब्बल ८२ कोटी रुपयांचं नुकसान केलं आहे. ही घटना एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधी मध्ये घडली होती. याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी दत्तात्रय प्रभाकर काळे यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांत फिर्याद दिली होती. ही चोरी कंपनीमधील माझी तीन कर्मचाऱ्यांनी आणि एका महिलेने मिळून केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांनी माजी कर्मचारी विश्वजीत मिश्रा, नयूम शेख ,सागर विष्णू यांना अटक केली आहे. सायबर पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले तीन लॅपटॉप चार मोबाईल हस्तगत केले आहेत, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या माजी कर्मचाऱ्यांनी चोरी केलेला डेटा सोल्युशनचा वापर करून स्वतःची नवीन कंपनी स्थापन केली होती. एवढेच नाही तर या कंपनीच्या नावाखाली त्यांनी १०० हून अधिक बेकायदेशीर वेबसाईट तयार करून त्या ग्राहकांना विकल्या होत्या.

या प्रक्रियेत फिर्यादी यांच्या कंपनीला मिळणारा मोबदला आणि भविष्यातील करारातील अपॉर्च्युनिटी लॉस तसेच इतर तांत्रिक सेवांचा महसूलही मोठ्या प्रमाणावर कमी झाला होता या सर्व गोष्टींमध्ये कंपनीचे ८२ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. अटकेत असलेल्या आरोपींनी केवळ भारतातच नाही तर अमेरिकेमध्ये सुद्धा असलेल्या ग्राहकांसोबत संगनमत करून गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी डेटाची सुरक्षा आणि करारातील अटी , कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्याबाबत अधिक कठोर भूमिका घेणे गरजेचे असल्याचे आणि काही मोजक्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना कंपनीने पाठीशी न घालण्याचे आवाहन पोलिसांनी केला आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सायबर विभाग रविकिरण नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस कर्मचारी हेमंत खरात, अतुल लोखंडे, दीपक भोसले, नितेश बीचेवार, विनायक म्हसकर,सोपान बोधवड, ज्योती साळे,वैशाली बर्गे,शुभांगी ढोबले, दिपाली चव्हाण व अन्य पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon